बेकायदेशीरपणे रोडवरती उभी असलेली ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरवरती कारवाई करण्याची युवासेनेची मागणी

अकलूज न्युज

ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अकलाई कॉर्नर अकलूज ते माळीनगर रोड वरती अंदाजे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत सतत रस्त्याच्या बाजूला उभे असतात. त्यामुळे टेंभुर्णी-अकलूज रोड वरील वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन रस्ता जाम होत आहे.या अडथळ्यामुळे ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलं, नागरिक,रुग्णांचे व एस-टी बस यांची खूप मोठी गैरसोय होत आहे.आणि त्या रोडवर ट्रॅक्टर कायम उभे असल्यामुळे भविष्यकाळात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तरी लवकरात लवकर या थांबलेल्या ट्रॅक्टर वरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी निवेदना द्वारे युवासेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे व युवासेना अकलूज शहरप्रमुख शेखर भैय्या खिलारे यांनी प्रांताधिकारी अकलूज श्रीमती शमा पवार व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!