आचारसंहितामुळे वृक्ष व फळबाग लागवडिस मुदतवाढ देण्याची कृषिमंत्र्याकडे युवा सेनेची मागणी

अकलूज न्यूज

युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे यांनी महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत मोहगनी वृक्ष लागवड तसेच सर्व प्रकारचे फळ बाग लागवड करण्याचे बरेच प्रस्ताव पंचायत समिती मध्ये दाखल आहेत ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी लागवड करू शकला नाही ,नोव्हेंबर महिन्यामध्ये पदवीधर मतदार संघाची निवडणूक व माहे डिसेंबर महिन्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या लागवडीच्या कामांना मंजुरी मिळत नाही त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृक्ष लागवड करता येत नाही हे कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या निदर्शनास आणुन दिले


वृक्ष लागवड करण्याची महाराष्ट्र शासनाची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 आहे आचारसंहितेमुळे ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या वृक्ष लागवडी संदर्भातील मंजुरी आचारसंहितेमुळे थांबले आहेत यांना 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी विनंती युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा श्री दादाजी भुसे साहेब यांना केली आहे.
मुदत वाढ झाल्याने शेतकर्‍यांना मोठा लाभ होईल व इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात वृक्ष लागवडीचे क्षेत्र व फळ बाग लागवडीचे क्षेत्र वाढेल . मा श्री मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी वृक्षलागवडीकडे वळण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरेल . महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा श्री दादाजी भुसे साहेब म्हणाले की शेतकऱ्यांनच्या हिताचा विचार करून वृक्ष लागवडीस मुदत वाढ देण्याचा प्रयत्न करेन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!