मनसेच्या नेत्या रेश्माताई टेळे यांनी कोरनाग्रस्तांना जेवण देत जपली सामाजिक बांधिलकी

माळशिरस येथील मनसेचे नेते सूर्यकांत टेळे यांच्या पत्नी रेश्माताई सूर्यकांत टेळे यांनी माळशिरस ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णांना जेवण बनवून गेले पंधरा दिवस देत आहेत अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपलेली असल्याने रेशमाताई यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलेली आहे. कोरोनाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बाधित होत असल्याने एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रक्ताचे नातेवाईक पाठ फिरवतात प्रत्येक जण संपर्क टाळण्याचा प्रयत्न करतात कोरोना ने जवळची नाती तोडली मात्र समाज सेवा करणाऱ्या लोकांची नाती जोडली गेली. अशा वेळी कोरोना रुग्णांची जेवणाची गैरसोय होऊ नये कारण अनेक गावांमधून कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी शहरात येत असतात सर्वांचीच परस्थिती सारखी असते असे नाही काही लोकांच्या घरामध्येही अडचणी असतात अशावेळी वेळेवर जेवणाचा डबा घरून येत नाही ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजामध्ये जन्मलेलो आहे समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त हेतूने सामाजिक नेत्या रेश्माताई टेळे यांनी स्वतः घरामध्ये दररोज 10 जेवणाचे डबे तयार करून कोरोना रुग्णांना गेली दररोज स्तुत्य उपक्रम सुरू आहे रुग्णांना व नातेवाईकांना या उपक्रमामुळे अंतकरण प्रेमाने भरून येत आहे. रुग्णांना घरचे जेवण मिळत असल्याने आपण रुग्णालयात आहोत याचा जेवण करताना विसर पडत आहे. रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रेश्मा ताई यांना सुद्धा आपण केलेल्या मदतीचा खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या लोकांना योग्य उपयोग होत असल्याचे समाधान लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!