राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सरचिटणीस दिलीप बाप्पू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे यांच्या सहकार्याने आप्पासाहेब कर्चे मित्र मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने गोरगरीब जनतेला मोफत जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.त्यावेळी मनसे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे,मनसे तालुका सचिव लक्ष्मण नरुटे, मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष मंगल ताई चव्हाण, पिंपरी गावच्या सरपंच संगीता अविनाश कर्चे ,उपसरपंच मारुती रायबा कर्चे , माजी सरपंच दादासाहेब उमाजी कर्चे, माजी पोलीस अधिकारी लालासाहेब गणपत कर्चे, पोलीस पाटील नानासाहेब कर्चे, विकास सेवा सोसायटी सदस्य अविनाश कर्चे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पोपट कर्चे, तात्यासाहेब बाजीराव कर्चे ,नानासाहेब यशवंत कर्चे ,ह भ प शंकर महाराज कर्चे, रामचंद्र अनंत कर्चे,बबन धोंडीबा कर्चे ,पत्रकार रतीलाल कर्चे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सर्वसामान्य गोरगरीब निराधार लोकांना किराणा किट, सनी टायझर बॉटल व मास्क वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना मनसे लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे म्हणाले दरवर्षी मोठ्या थाटामाटात आम्ही आमचे दैवत मा राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जोरात साजरा करीत असतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेत असतो. संपूर्ण जून महिना आमच्यासाठी एक आनंदाची वेगळी संधी असते, राज साहेबांच्या म्हणीप्रमाणे वीस टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण याप्रमाणे यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना निराधार लोकांना 101 मोफत किराणा किट वाटून या वर्षीचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये हा उपक्रम येत्या दहा दिवसांमध्ये साजरा केला जाणार असूनयासाठी तालुक्यातील प्रत्येक मनसैनिक व पदाधिकारी मोठ्या उत्स्फूर्त पणे प्रतिसाद देत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आपण हे सर्व कार्यक्रम यशस्वी करीत आहोत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!