आदित्य जी ठाकरे साहेब यांच्या वाढदिसानिमित्त युवासेनेचे साडी वाटप


युवासेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश दादा इंगळे यांच्या वतीने युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी शिवसेना नेत्या सौ रश्मीताई बागल, महिला उपजिल्हाप्रमुख आशाताई टोणपे, मिनाक्षीताई जगदाळे, यशश्री पाटील , समाजसेवक अतुलजी खुपसे,युवासेना उपजिल्हाप्रमुख विक्रम सोनु पराडे पाटील, युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे किरण भांगे अमोल जगदाळे दत्ता भाऊ साळुंखे आबा मस्के बंडू काका ताटे बाळासाहेब जाधव बाळासाहेब पाटील उत्तम ताटे सतीश काकडे सागर इंगळे बबन पराडे नरा इंगळे कल्याण इंगळे सुभाष पराडे अर्जुन लावंड रामा इंगळे अप्पा ताटे आदी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मंत्री आदित्य साहेब ठाकरे पुढे घेऊन जात असताना ८०% समाजकारण व २०% राजकारण या शिकवणीनुसार काम करत आहेत याच गोष्टींचा आदर्श घेऊन पोस्टर बॅनरबाजीला व इतर खर्चाला बगल देत माळशिरस तालुका युवासेनेच्या वतीने गरजू महिलांना साडी वाटप, शिवसेनेच्या नेत्या रश्मीताई बागल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी असंख्य गरीब महिला उपस्थित होत्या साडी वाटप चा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशांत पराडे ओम पराडे बबलू इंगळे दयानंद इंगळे बाला पराडे समाधान पराडे आदी नी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!