नॅशनल वूमेन्स एक्सीलेंस अवार्ड पुरस्काराने डॉ पंचशीला लोंढे यांचा वित्तीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते दिल्लीत सन्मान!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील चांदापुरी-गारवाड (सोलापूर) येथील सोशल संस्थेच्या अध्यक्ष सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज च्या सचिव व ह्यूमन राईट फेडरेशन च्या राष्ट्रीय संचालक डॉ.पंचशीला लोंढे मॅडम यांना (आरोग्य,शिक्षण ,सामाजिक) कार्याबद्दल दिल्ली येथे नॅशनल वुमेन एक्सीलेंस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. नॅशनल युथ अवार्ड, विशाखा वेलफियर, सोशल फाऊंडेशन नवी दिल्ली या संस्थांच्या विद्यमाने महाराष्ट्र सदनच्या प्रेस हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.पंचशीला लोंढे या गेली बारा वर्षे दुष्काळग्रस्त लोकांना,ऊसतोड कामगार,पंढरपूर वारी मधील वारकरी,दादर येथे भीम अनुयायी यांना सोशल संस्थेच्या माध्यमातून मोफत औषधें, वैद्यकीय उपचार सेवा देत आहेत.शिक्षणासाठी गरीब मुलांना दत्तक घेणे,सांगली कोल्हापूर पूरग्रस्त लोकांना शैक्षणिक, आरोग्य मदत तसेच उपचार साठी पैसे नसणाऱ्या लोकांना आर्थिक मदत असे अनेक सामजिक उपक्रम कोणत्याही शासकीय अथवा देणगीदार शिवाय चालू आहेत.
त्यांचा मानस आहे आपण ज्या परिस्थितीतुन आलो आहे त्या परिस्थितीत प्रचंड त्रास व शोषण आहे .यास छेद देण्याकरिता माझे पती डॉ कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या शेवटच्या घटकास न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा पुरस्कार म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व गुणिजनाचा आहे असे विचार त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.
जागतिक महिला दिन सोहळ्याच्या निमित्ताने देशातील 55 कर्तबगार महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय मानव अधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर म. मळे, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा, दिल्ली मायनॉरिटी कमिशनच्या सदस्या नॅन्शी बारलो, मागास व भटके विमुक्त आयोगचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू (दादा) रामजी इदाते, सेंट्रल ह्यूमन राईट संघटन चे राष्ट्रीय सल्लागार सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई,सेंट्रल ह्यूमन राईट चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,सेंट्रल ह्यूमन राईट चे सल्लागार डॉ.बलबीर सिंग,तेलंगणाचे CHRS चे हेड रविकांत, मीडिया हेड कुमार स्वामी, महाराष्ट्र राज्य प्रोटेक्टिव्ह हेड धनंजय डांगळे (CHRS),उद्योग विभागाचे दिनेश बिरवाडकर (CHRS),उत्तरप्रदेश हेड (CHRS) ओंकार शर्मा,दिल्ली येथील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी ही उपस्थित होते.
सदर पुरस्कार मिळाल्याने बार्टी चे समता दूत किरण वाघमारे,महामंडळाचे पप्पू तिकोटे, SNP प्रशाला व ज्यू कॉलेज प्राचार्य साठे सर,प्रा. सरक,प्रा.वायदंडे,प्रा.पठाण,प्रा.धाइंजे,केपीजेएस चे सर्व संचालक मॅनेजर राजू खरात,सोशल संस्था व समजातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!