बदलत्या काळाचे भेदक विचारपीठ..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माळशिरस नगरपंचायतीच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. रेश्माताई सुरेश टेळे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त माळशिरस नगरपंचायत मधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी दहा किलो साखर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते मोफत देण्यात आली. यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोडे, नगरसेवक कैलास वामन, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष योगेश देशमुख, माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे शामराव वाघमोडे, मनसे विद्यार्थी सेनेचे माळशिरस शहराध्यक्ष किशोर शिद, मनसे शेतकरी सेना आरोग्य प्रमुख नानासाहेब गोरे, माळशिरस शहराध्यक्ष गणेश वाघमोडे, संतोष टेळे, अरुण लवटे, बाळासाहेब बुरुंगले, सनी गुरव , अनिकेत काशीद. इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते..
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.