लॉकडाऊन च्या काळात मजुरांचे भुकेने हाल होऊ देणार नाही – वैभव गिते

कुरभावी (शासननामा प्रतिनिधी)
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे परराज्यातुन आलेल्या ऊसतोडनी कामगार गरीब व गरजू व्यक्तींना ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गहू, तांदुळ, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे नेते नितीन धायगुडे यांच्या उपस्थितीत कुरबावी गावचे पोलीस पाटील कुलदीप दनाने पाटील ग्रामसेवक काळे यांच्या देखरेखीखाली सर्व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी विशाल साळवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लॉक डाऊन च्या काळात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे व तालुका प्रशासनाचे आभार मानले.रासपचे नेते नितीन धायगुडे यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचने मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केल्याने कौतुक केले.गोरगरिबांना मदत करणे हीच खरी सेवा आहे असे म्हंटले यावेळीआंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी माळशिरस तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या मजुरांची हेळसांड होऊ देणार नाही महापुरुषांचा जयंती महोत्सवानिमित्त प्रत्येक गरजु व्यक्तीस अन्न धान्याचे वाटप करण्यात येणार आहे असे म्हंटले.धान्य मिळालेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.धान्य वाटपाचे संयोजन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी केले तर प्रमोद शिंदे व दत्ता कांबळे यांनी मोलाची साथ दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!