जनसेवा संघटना इंदापुर तालुका यांचेवतीने निमसाखर येथील शिबिरात 59 रक्तदान

इंदापूर ऑनलाइन बातमीदार

राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. सदर आवाहानास महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत याच अनुषंगाने
निमसाखर गावामध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले होते . या शिबीरामध्ये निमसाखर व परिसरातील सर्व नागरिक, सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षाचे सर्व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन 59 रक्तदात्यांनी रक्तदान केले
या शिबीराचे उदघाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दत्तामामा भरणे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व सभापती श्री. प्रवीणभैय्या मानेराष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,जि.प.सदस्य प्रताप पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,अभिजीत रणवरे, नंदकुमार रणवरे, बाबुराव रणवरे, अनिल रणवरे, सरपंच संगिता लवटे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, कृषी साहाय्यक मार्तंड देवडे, अनिल बोंद्रे, पोपट कारंडे, विनोद रणसिंग, विरसिंह रणवरे, डॉ नारायण रणवरे, नवनाथ रणवरे, सुनिल कारंडे, बाळू मुलाणी, रामभाऊ रणसिंग, लालासाहेब चव्हाण, शेखर पानसारे, पांडुरंग पानसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी हर्षल रणवरे, पिनू रणवरे, सागर रणवरे, शैलेश पवार, युवराज आडसूळ, दीपक रणवरे, सत्यजीत रणवरे, आकाश वाघ इत्यादींनी परिश्रम घेतले.
या शिबीर मध्ये सहभाग घेतलेबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार संयोजक व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष श्री. सुदर्शन रणवरे मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!