प्रतापसिंह चौक ते धवलनगर रस्ता दुरूस्तीची मागणी काँग्रेस पक्ष आक्रमक अधिकाऱ्यांना घेराव घालून २८ तारखेला तीव्र आंदोलन करणार

अकलूज : काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री डी एस चौगुले आणि उप अभियंता लक्ष्मण डाके यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांनी निवेदन देवून अकलूजमधील प्रतापसिंह चौक ते धवलनगर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.यावेळी कॉग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,रफिक मुलाणी,अनिल खंडागळे इत्यादी उपस्थित होते.

अकलूजमधील प्रतापसिंह चौक ते धवलनगर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे,रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून खड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डा आहे,हेच लक्षात येत नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

रस्त्याच्या कामाला २७/२/२३ पर्यंत चालू न केल्यास संबंधित अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा देवून २८/२/२३ रोजी प्रतापसिंह चौक या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!