अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्तमराव जानकर यांच्या लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालयाच्या वतीने तिरवंडी येथे रेशन कार्ड व विविध दाखल्याच्या कॅम्पचे आयोजन


माळशिरस प्रतिनिधी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व तिरवंडी ग्रामपंचायतचे सदस्य शामराव बंडगर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक उपक्रम व सामाजिक उपयोगी कामे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालयाच्या वतीने तिरवंडी येथे रेशन कार्ड व विविध दाखल्याचा कॅम्पच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या आयोजन ग्रामपंचायत व शामराव बंडगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जेष्ट नेते कुंडलिकआबा वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाला सरपंच नानासाहेब वाघमोडे ,युवा नेते नागेश वाघमोडे ,ग्रामपंचायत सदस्य शामरावजी बंडगर,रामचंद्र बुद्धे,राजाभाऊ सरगर ,एम डी सरगर,दिलीप वाघमोडे,समाधान माने,साहेबराव वाघमोडे,पोपट शिद, पै महादेव वाघमोडे ,सचिन वाघमोडे, पै काशिनाथ वाघमोडे ,पप्पू पाटील, हरिभाऊ वाघमोडे उपस्थित होते
लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालयाच्या वतीने जनसेवक विकी भिसे ,बुद्धभुषन बनसोडे रोहीत धाईंजे ,प्रमोद मिसाळ यांनी नागरिकांच्या अडचणी व कागदपत्रे घेतली यावेळी जवळपास 103 लोकांनी रेशनकार्ड व विविध दाखलेची कामे दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!