डॉ.टेळे यांनी रोवला माळशिरसच्या शिरपेचात मानाचा तुरा

माळशिरस शहरातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर अप्पासाहेब भिवाजी टेळे यांनी सिलेक्शन ऑफ आयडियल इंट्राअक्युलर लेन्स या विषयावर पेपर प्रेझेंटेशन केल्यामुळे प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करून माळशिरस तालुक्यात शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. त्यामुळे माळशिरस नगरपंचायत यांच्या वतीने त्यांचा सत्कार नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी मुख्याधिकारी नितीन गाढवे मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे मारुती वाघमोडे इत्यादी उपस्थित. हा कार्यक्रम सहा सात आठ ऑक्टोबर रोजी गोवा येथे पार पडला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डॉक्टर अप्पासाहेब टेळे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला देश विदेशातील हजारो डॉक्टरांनी हजेरी लावलेली होती सहावी आंतरराष्ट्रीय व अठरावी राष्ट्रीय परिषद सिनर्जी 2023 टास द असोसिएशन ऑफ शलका महाराष्ट्र यांनी गोवा येथे आयोजित केलेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!