युवकांनी पक्ष कार्यात सक्षम बनावे उत्तमराव जानकर

वेळापूर येथे युवक पदाधिकाऱ्यांच्या निवडी

वेळापूर प्रतिनिधी
युवकांमध्ये प्रचंड संघटन शक्ती असून युवकानी तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाचे काम पोहचून पक्षाची ध्येय धोरणाचा प्रचार व प्रसार युवकांनी सक्रिय होऊन काम करण्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केले.
वेळापूर, ता. माळशिरस येथील गरुड या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक आघाडीचे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी राज्याचे नेते रमेश पाटील,प्रांतिक सदस्य वसंतराव पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे,विकास धाइंजे,शंकरराव काळे पाटील ,ऍड अविनाश काले, शामतात्या मदने,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल सावंत ,पंचायत समिती सदस्य अजय सकट,नगरसेवक मारुती देशमुख,ड्रॉ तुकाराम ठवरे, सौरभ बागनवर ,मोहन कचरे
धानोरे गावचे सरपंच जिवन जानकर, पी एस गायकवाड,महावीर धायगुडे,अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष सालार पठाण उपस्थित होते
यावेळी युवक तालुका सरचिटणीसपदी भुजंगराव शिंगाडे(काळमवाडी), आनंद पवार(अकलूज),तालुका उपाध्यक्षपदी प्रताप मगर(निमगाव), अमोल मदने(पिलीव), रमेश ननवरे(लोंढे मोहितेवाडी), साहिल अनपट(शिंदेवाडी), राहुल खटके(जांभुड), ऋषिकेश सावंत(दसुर), महेश थिटे(कारूंडे), दीपक गोरड(गोरडवाडी) , सहसचिवपदी सुनील गोरे(फोंडशीरस), नितीन रुपनवर(फडतरी), संघटकपदी अक्षय खंडागळे(दहिगाव), दादा मुलाणी(नातेपुते), लहू पाटील(पिलीव), कोषाध्यक्ष पदी आप्पासाहेब मारकड(मारकडवाडी), सहकोषाध्यक्षपदी प्रज्योत रणवरे, प्रसिद्धी प्रमुखपदी युवराज रणदिवे(फोंडशीरस), सह संघटकपदी समाधान कोळेकर(चाकोरे) तसेच विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्षपदी
इंद्रजित रुपनवर (कारुंडे)
अल्पसंख्याक सेलच्या
तालुका उपाध्यक्षपदी
वाहीद मुलाणी( एकशिव) यांच्या निवडी करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!