सदाशिवनगरच्या शंकर साखर कारखान्याचे सात संचालक अपात्र

भानुदास सालगुडे यांच्या प्रयत्नाला यश

माळशिरस

 शंकर सहकारी साखर कारखान्यातील सात संचालकांना अपात्र करण्यात आले.साखर कारखान्याने केलेल्या उपविधीचा व सहकार कायद्याचा भंग केल्याने सोलापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी हि कारवाई केली.माजी खासदार विजयसिंह व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

          शेअर्सच्या प्रमाणात या संचालकांनी कारखान्याला उस पुरवठा केला नसल्याने त्याच्यावर अपात्रेची कारवाई करण्यात आली आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत या सात संचालकांच्या उमेदवारी अर्जावर भानुदास सालगुडे –पाटील यांच्यासह इतरांनी त्याच वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे हरकत घेतली होती.

श्री.पाटोळे यांनी हि हरकत फेटाळल्याने तक्रारदरांनी या प्रकरणी उच्च न्यायालयातून हे प्रकरण साखर सहसंचालक कार्यालयात आले.साखर सहसंचालक कार्यालयाने या प्रकरणी संबधित संचालकांना नोटीस देऊन सुनावणीही घेतली.या सुनावणी नंतर सात संचालकांवर अपात्रेची कारवाई करण्यात आली.

          माजी सहकार राज्यमंत्री कै.प्रतापसिंह यांच्यानंतर या कारखान्यांची धुरा त्यांचे पुत्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आली.नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत या कारखान्याच्या निवडणुकीत या कारखान्यावर विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे.

दरम्यान,सोलापूरला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय सुरु झाल्यानंतर या कार्यालयाची पहिलीच व सर्वात मोठी हि कारवाई मानली जात आहे.उसबिले थकविणा-या कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याची प्रक्रिया या कार्यालयातून राबविली जाते.आता संचालक अपात्र करण्याची मोठी महत्वपूर्ण कारवाई या कार्यालयाच्या माध्यमातून झाली आहे.

या संचालकांना करण्यात आले अपात्र

नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत फोंडशिरस गटातून विजयी झालेले चंद्रकांत शिंदे,संजय कोरटकर व दत्तू वाघमोडे,इस्लामपूर गटाचे संचालक अमित माने,बोरगाव गटाचे संचालक भगवान मिसाळ व दत्तात्रय चव्हाण आणि इतर मागासवर्गीय गटाचे संचालक  शिवाजी गोरे या सात संचालकांना अपात्र करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!