कै.शिवाजीराव पाटील कुस्ती केंद्रातील एका कुस्तीयोद्ध्याची ओळख पै.राहुल वाघमोडे

पै.राहुल गेना वाघमोडे (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता)
गाव माळशिरस जि.सोलापुर
वस्ताद आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा.पै.अमोल साठे सर कराड व पै.विक्रम(काका) पाटील माळशिरस यांचा पठ्ठा
पैलवान राहुलचा जन्म हा एका शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती त्यावेळी तशी बेताचीच. त्याने कुस्तीचा श्रीगणेशा माळशिरस येथेच कै.शिवाजीराव पाटील कुस्ती केंद्रात साधारण २००८-०९ मध्ये केला.
कै.शिवाजीराव पाटील कुस्ती संकुलाचा इतिहास सांगायचा झाला तर २००४ मध्ये एक कुस्तीप्रेमी व्यक्तीमत्व, एक पेशाने डॉक्टर असलेला माणुस आणि सध्याचे माळशिरसचे उपनगराध्यक्ष डॉ.मारुतीराव पाटील यांनी माळशिरस शहरात एक सर्वसोईयुक्त तालीम बांधली. उद्देश्य फक्त एकच सशक्त आणि सदृढ पिढी घडावी आणि माझ्या भागातील मुलांनी देशाच्या कानाकोप-यात माळशिरसचे नाव कुस्तीमध्ये पोहचवावे.
सुरवातीच्या काळात त्याची कुस्तीत जास्त काही प्रगती नव्हती परंतु त्याकाळी तालमीत कुस्ती कोच म्हणुन पै.दिपक बेद्रे सर यांची नियुक्ती झाली आणि कुस्तीत प्रगती उत्तरोत्तर वाढत चालली होती. आजुबाजुची मैदाने व स्पर्धेत आपल्या कुस्तीची चुणुक दाखवु लागला. त्यावेळी शालेय जिवनात अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदकाला गवसणी घातली.
त्यानंतर शिक्षणातुन थोड लक्ष कमी होऊ लागले आणि बारावीच्या परिक्षेत अपयशही आले परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
त्यानंतर तो आशियाई सुवर्णपदक विजेते प्रा.पै.अमोल साठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे सराव करु लागला. अमोल सरांनी त्याच्यातील सुप्त गुण ओळखले.
बारावीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर फार्मसीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला आणि कॉलेजमुळे कुस्ती सुटण्याची चिन्हे दिसु लागली परंतु कुस्ती ही एक अशी नशा आहे की एक जातीवंत पैलवान कुस्तीपासुन दुर राहुच शकत नाही.
तेव्हा त्याने नियतिशीही कुस्ती खेळण्यास सुरवात केली.
राहुलने कॉलेज पुर्ण करत पुन्हा चित्रदुर्ग-बेंगलोर(कर्नाटक) येथे पुन्हा कुस्तीची सुरवात केली आणि सलग दोन वर्ष राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तर शिक्षणही पुर्ण केले परंतु लोकांना मिळवलेले यश दिसते पण त्यामागचा संघर्ष कधीच दिसत नाही. त्याकाळात खुराक तर खुप लांबची गोष्ट पण साधं महाराष्ट्रीयन जेवन सुद्धा त्याठिकाणी मिळु शकत नव्हत.
परंतु इतरांसारखे हात गाळुन बसेल तो पैलवान नसतो ही शिकवन त्याला त्याचे गुरु अमोल सरांनी दिली आणि त्याचे पालन त्याने तंतोतंत केले.
आज तो शालेय, आंतरशालेय, विद्यापिठ, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत कित्येकवेळा सुवर्णपदक मिळवणारा पैलवान ठरला आहे.
त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन ऑलिम्पिकवीर मेजर ध्यानचंद केंद्रिय क्रिडा परिषद नवी दिल्ली राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच अनेक सामाजिक व क्रिडा संस्थानी कुस्ती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
तसेच चालु वर्षी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार मा.श्रीनिवास पाटील साहेब, हिंदकेसरी पै.दिनानाथ सिंह आण्णा, डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील यांच्या हस्ते कराड येथे जंगी सत्कार करण्यात आला आणि कराडकरांनी कायम आपलेपणाचे दर्शन घडवले.
गुरुवरील श्रद्धा, आईवडिलांचा आशिर्वाद, नातेवाईक व मित्रपरिवारांची खंबीर साथ मिळाल्याने त्याने सर्व यश मिळवल्याचे तो सांगतो.
तसेच पै.विक्रम(काका) पाटील यांचाही त्याच्या पुर्ण जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे आणि कायम पाठीशी ठामपणे उभे रहातात.
तसेच त्याच्यातील गुण ओळखुन कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य या कुस्ती संघटनेने माळशिरस तालुक्याची जबाबदारी खांद्यावर दिली तसेच सातारा जिल्हा ग्रॅपलिंग असोसिएशन, ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन सातारा यामध्ये क्रिडा संघटक म्हणुन काम पहात आहे.
तो सध्या तारेवरची कसरत करत माळशिरस येथेच मेडिकल प्रशिक्षण व कुस्तीचा सराव करत आहे.
त्याने कुस्ती क्षेत्रासाठी प्रेरणेचा एक स्त्रोत निर्माण केला आहे.
यातुन अनेक नवोदित मल्ल नक्कीच प्रेरणा घेतील यात शंकाच नाही.
पै.रमेश थोरात (बाळसिद्ध केसरी)
कुस्ती हेच जीवन परिवार महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!